सामाजिक आरोग्य

सामाजिक आरोग्य

views

4:01
आपण नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी, निरोगी राहाण्यासाठी प्रयत्न करीत असतो. त्यासाठी आपण पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि आपल्या आवडीचे जे छंद असतात त्यांची जोपासना करीत असतो. यांतून आपल्याला उत्तम आरोग्य मिळते. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. जसे आपण आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करतो, तसे समाजातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सुद्धा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आपण नेहमी तणावरहित व आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, तसे संपूर्ण समाजातील लोक कसे आनंदी व प्रसन्न राहतील यासाठीही आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपले व्यक्तिगत आरोग्य व स्वच्छतेच्या सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते. उदा: प्रत्येकाला जर कचराकुंडीतच कचरा टाकण्याची सवय असेल, तर कोणीही कोणत्याही प्रकारचा कचरा रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी टाकणार नाही. यामुळे रस्ते व आपल्या आसपासच्या परिसरात स्वच्छता राहील. म्हणजेच मुलांनो आपल्या व्यक्तिगत सवयी चांगल्या असतील, तर त्याचा फायदा सामाजिक आरोग्य राखण्यासाठीही होतो. आपले सामाजिक आरोग्य हे अनेक कारणांमुळे धोक्यात येत असते. त्यांतून अनेक लोकांना त्रास व धोका निर्माण होत असतो. उदा: प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकांनी केलेला दंश किंवा कीटक चावणे यांपासून होणाऱ्या आजारांतून सामाजिक आरोग्य धोक्यात येते. अशा कारणांमुळे होणाऱ्या आजारांपासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणे आणि त्यांना आनंदी व स्वास्थ्यपूर्ण जीवन उपलब्ध करून देणे, म्हणजे सामाजिक आरोग्याची जोपासना होय.