सामाजिक आरोग्य

तंबाखूसेवन व मद्यपान – मृत्यूला आव्हान

views

4:12
तंबाखू, दारू व विविध आमली पदार्थ नशा उत्पन्न करतात. त्यांचा शरीरात प्रवेश होताच माणसाला गुंगी आल्यासारखे होते. त्यातून माणसाला तात्पुरते सुख मिळते. परंतु त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागतात. व त्यांचा शेवट व्यक्तीचा प्राण घेऊनच होतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीने या व्यसनांमुळे होणाऱ्या परिणामांचा आधी विचार करावा व त्यांच्यापासून शक्य तितक्या दूर राहण्याचा प्रयत्न करावा. तसेच जर कोणी मद्यपान व धुम्रपानाच्या खूपच आहारी गेले असेल, तर त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन आणि वैद्यकीय मदत करावी. आपण नेहमी आपला आहार वेळेच्या वेळी घ्यावा. भरपूर मैदानी खेळ खेळावेत. आपल्या आवडीचे विविध छंद जोपासावेत. उदा: वाचन करणे, पोहणे, गाणी ऐकणे, सायकल चालविणे यांसारख्या चांगल्या गोष्टींना आपला जास्तीत जास्त वेळ द्यावा. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मनावर संयम असावा, खंबीरपणे कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे.