सामाजिक आरोग्य

तंबाखू सेवन

views

3:10
तंबाखू हे सर्वात प्राचीन व्यसन आहे. फार पूर्वी पैशांऐवजी तंबाखूचा चलन म्हणून वापर होत होता. इतके तंबाखूचे महत्त्व होते. आजही आपण तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट, मशेरी, मावा, पानमसाला अशा अनेक तंबाखूचा वापर असलेल्या पदार्थांची नावे सतत ऐकत असतो. आताही तंबाखूचे सेवन अनेक व्यक्ती करताना दिसतात. अगदी शाळकरी मुलेही तंबाखू खातात, सिगारेट ओढतात. परंतु मुलांनो तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ खाणे हे आरोग्याला खूप घातक आहे. तंबाखूचे व्यसन प्रथम दुसऱ्याने सहज, आग्रहाने दिलेल्या तंबाखूतून लागते. सहज म्हणून खायला सुरुवात केलेली ती व्यक्ती पुन्हा-पुन्हा तंबाखू खाऊ लागते. वारंवार तंबाखू खाल्ल्याने अशी व्यक्ती तंबाखूच्या पूर्णत: आहारी जाते. कोणत्याही कामात त्याचे लक्ष लागत नाही. तोंडात कायम तंबाखू असतो. असे जेव्हा होते तेव्हा त्या व्यक्तीला तंबाखूचे व्यसन लागले असे म्हणतात. तंबाखू खाणारी व्यक्ती सतत जागोजागी थुंकत असते व त्यामुळे परिसर घाण करत असते. मुलांनो, या तंबाखू सेवनाचे काही दुष्परिणाम आहेत.