सामाजिक आरोग्य

मद्यपान

views

3:03
आपण तंबाखूच्या व्यसनामुळे आपल्या शरीरावर कोणकोणते वाईट परिणाम होतात ते पाहिले. अशाच प्रकारचे काही वाईट परिणाम मद्यपानामुळेही आपल्या शरीरावर होत असतात. मद्यपान म्हणजे दारू पिणे होय. मद्यपानाचे काही दुष्परिणाम: 1) मद्यपान केल्यामुळे गुंगी येते व मेंदूवरील नियंत्रण सुटते. मद्यपान केलेल्या व्यक्तीला आपण काय बोलत आहोत तेच कळत नाही. तसेच आपण काय करीत आहोत याचेही भान त्या व्यक्तीला राहत नाही. 2) अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे (किडनीचे) रोग होतात. 3) तंबाखूचे सेवन व मद्यपान करणे या दोन्हीही वाईट सवयी आहेत. या सवयी एकदा का लागल्या की त्या सहजासहजी सुटत नाहीत. 4) मद्यपान तसेच तंबाखू सेवनामुळे त्या व्यक्तीला झोप न येणे, उलटी, मळमळ, पोटात आग होणे, डोके दुखणे, डोके जड होणे असे त्रास होतात. 5)त्याचबरोबर घरातील इतरांना त्यांच्या व्यसनापायी हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. औषधपाणी करण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो, त्यात वेळ वाया जातो, सर्वांना कष्ट पडतात, कुटुंबात ताणतणावाचे, निराशाचे वातावरण तयार होते. 6) मद्यपान करणाऱ्या व्यक्तीचा कौटुंबिक, सामाजिक व कामाच्या ठिकाणी असलेला दर्जा या व्यसनामुळे घसरतो. मद्यपान करणाऱ्या व्यक्तीने आपल्यामुळे आपले कुटुंबही उध्वस्त होते आहे याची जाणीव ठेवून व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.