पदार्थ आपल्या वापरातील

टूथपेस्ट

views

3:01
इ.स. पूर्व 500 पूर्वी चीन, ग्रीस, रोम या देशांमध्ये हाडे, शिंपले यांचा चुरा मिसळून टूथपेस्ट तयार करत असत. एकोणिसाव्या शतकापासून टूथपेस्ट वापरायला सुरुवात झाली. त्यावेळी त्यात साबणाचा वापर करण्यात आला होता. कोलगेट ही जगातील पहिली टूथपेस्ट होती. जगातील पाहिली व्यावसायिक टूथपेस्ट ही कोलगेट कंपनीने न्यूयॉर्क शहरात 1873 साली तयार केली. टूथपेस्टमध्ये कॅल्शिअम कार्बोनेट, कॅल्शिअम, हायड्रोजन, फॉस्फेट हे प्रमुख घटक असतात.कॅल्शिअम कार्बोनेट, कॅल्शिअम हायड्रोजन, फॉस्फेट हे घटक दातांवरील घाण दूर करतात. दातांना पॉलीश करण्याचे कामदेखील हे घटक करतात. तसेच टूथपेस्टमध्ये ठरावीक प्रमाणात फ्लोराइडचा देखील उपयोग केलेला असतो. फ्लोराइड दातांवरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असते. यामुळे दंतक्षय रोखला जातो. फ्लोराइड हे निसर्गतः आढळणारे मूलद्रव्य आहे. पाण्याच्या सर्व स्त्रोतांत फ्लोराइड असते. मॅग्नेशिअम फ्लोराइडच्या स्वरूपात टूथपेस्ट व टूथपावडरमध्ये फ्लोराइड घातले जाते. ते दातांच्या आवरणात शोषले जातात.