पदार्थ आपल्या वापरातील

संश्लिष्ट अपमार्जक

views

3:13
संश्लिष्ट या शब्दाचा अर्थ असा होतो की, संयोगद्वारे निर्माण होणारी वस्तू किंवा अनेक घटक एकत्रित करून त्याद्वारे मूळवस्तूंसारखी एखादी कृत्रिम वस्तू तयार करणे. साबणाची जागा आता मानवनिर्मित संश्लिष्ट अपमार्जकांनी घेतली आहे. हे अपमार्जक तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. संश्लिष्ट अपमार्जकांच्या रेणूंमध्ये मोठया लांबीचे घटक असतात. हे घटक प्रामुख्याने स्निग्धपदार्थ किंवा केरोसीन या कच्च्या मालापासून मिळवले जातात. नंतर मग या घटकांवर विविध रासायनिक क्रिया केल्या जातात. या सर्व प्रक्रिया करून संश्लिष्ट अपमार्जके बनवली जातात. संश्लिष्ट अपमार्जकांचा वापर बाजारात मिळणाऱ्या विविध प्रसाधनांमध्ये करतात. ही संश्लिष्ट अपमार्जके कठीण पाण्यातसुद्धा विरघळतात आणि वापरताही येतात.