पदार्थ आपल्या वापरातील

अपमार्जके

views

3:35
अपमार्जन म्हणजे स्वच्छ करणे. आणि अपमार्जक म्हणजे स्वच्छ करणारा पदार्थ. कपडे धुण्याचा साबण, कपडे धुण्याची पावडर, कपडे धुण्याचा सोडा, शाम्पू, लिक्विड सोप, रिठा, शिककाई हे स्वच्छ करणारे पदार्थ म्हणजे अपमार्जके आहेत. हे सर्व पदार्थ वस्तूतील घाण व मळ काढून टाकतात. म्हणजेच वस्तू स्वच्छ करतात. शरीराच्या स्वच्छतेसाठी आपण साबण वापरतो तर कपड्यांच्या स्वच्छतेसाठी साबण आणि धुण्याची पावडर वापरतो. दैनंदिन जीवनात केसांना तेल लावणे, हातांना व पायांना जेल, व्हॅस्लीन लावणे अशा विविध कारणामुळे आपले शरीर, कपडे तेलकट होतात. हा तेलकट थर आपल्या कपड्यांमधील उभ्या – आडव्या धाग्यांमध्ये घट्ट चिकटून बसतो. तो काढण्यासाठीच आपण साबण वापरतो. पाणी व तेल दोघांनाही पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागांवर सहज पसरते. पृष्ठभागावर पसरण्याच्या या गुणधर्माला पृष्ठसक्रियता म्हणतात. अपमार्जके हे पृष्ठसक्रिय (Surface Active) असतात. पृष्ठसक्रियतेचा होणारा एक परिणाम म्हणजे फेस होणे.