पदार्थ आपल्या वापरातील

निसर्गनिर्मित अपमार्जके

views

3:02
काही अपमार्जके ही निसर्गनिर्मित असतात. रिठा, शिकेकाई हे पदार्थ निसर्गनिर्मित अपमार्जके म्हणून वापरले जातात. रिठा, शिकेकाईने पूर्वीच्या काळात बायका केस धुवत असत. आज देखील रिठा, शिकेकाई यांसारख्या पदार्थांचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या शाम्पूमध्ये केला जातो.या निसर्गनिर्मित अपमार्जकांचा म्हणजेच रिठा, शिकेकाई यांचा मानवी त्वचेवर तसेच रेशमी कपडे, लोकरीचे धागे यांवर अनिष्ट परिणाम होत नाही. रिठा व शिकेकाई यांमध्ये सॅपोनीन नावाचा रासायनिक पदार्थ असतो. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का? रिठ्याला इंग्रजीमध्ये सोपनट तर शिकेकाईला सोपपॉड असे म्हणतात. मानवनिर्मित अपमार्जके :- मुलांनो, साबण हा मानवनिर्मित अपमार्जक आहे. पण तो कसा तयार केला गेला? तर सुमारे 2000 वर्षांपूर्वी साबणाचा शोध पाश्चिमात्य देशांमध्ये लागला असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी प्राण्यांची चरबी आणि लाकडाची राख वापरुन साबण तयार केला जात होता. सध्या विविध प्रकारचे साबण आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. भांड्यांचे, कपड्यांचे आणि आंघोळीचे असे विविध प्रकारचे साबण आपण वापरतो.