पदार्थ आपल्या वापरातील

सिमेंट

views

4:49
बांधकाम करताना महत्वाचा घटक म्हणजे सिमेंट होय. मातीच्या घराला पावसाळ्यात ओल येण्याची शक्यता असते. वादळात काटक्यांनी बनवलेलं घर उद्धवस्त होऊ शकतं. पण सिमेंट वापरून बनवलेलं घर खूप मजबूत असते. तसेच कोणत्याही ऋतूत त्या घरात त्रास होत नाही. यावरून ह्या सर्व घरांमध्ये सिमेंटपासून तयार केलेलं घर खूप मजबूत असेल. सिमेंट हे बांधकामातील महत्त्वाचे साहित्य आहे. त्यापासून काँक्रीट तयार केले जाते. या काँक्रीटचा वापर करून पत्रे, विटा, खांब, पाईप बनवतात. सिमेंट ही कोरडी, सूक्ष्मकण असलेली हिरवट राखाडी रंगाची पूड असते. सिमेंट हे सिलिका (वाळू), अॅल्युमिना (अॅल्युमिनिअम ऑक्साइड), चुना, आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशिअम ऑक्साइड या सर्व घटकांपासून तयार केले जाते. पोर्टलंड सिमेंट हा बांधकामासाठी वापरला जाणारा प्रमुख प्रकार आहे. पोर्टलंड सिमेंट हे 60 % चुना (कॅल्शिअम ऑक्साइड), 25 % सिलिका (सिलिकॉन डायऑक्साइड), 5% अॅल्युमिना, उरलेला भाग आयर्न ऑक्साइड व जिप्सम (कॅल्शिअम सल्फेट) या कच्च्या मालापासून बनवतात. पोर्टलंड हे इंग्लंडमधील एक बेट आहे. आणि पोर्टलंड सिमेंटचा पोत त्या बेटावर काढण्यात येणाऱ्या दगडासारखा असतो. म्हणून या सिमेंटला पोर्टलंड सिमेंट असे नाव दिले आहे.