सजीवांतील विविधता व त्यांचे वर्गीकरण

वनस्पतींचे प्रकार भाग 2

views

3:59
वनस्पतींच्या खोडांचा आकार व उंचीनुसार त्यांचे वृक्ष, झुडूप, रोपटे असे प्रकार होतात. काही वनस्पती गवतासारख्या दिसतात. तुम्ही गवतीचहा पहिला असेल किंवा ऊस? काही वनस्पती उंच डेरेदार असतात. आंब्याचे झाड, वडाचे झाड, पिंपळाचे झाड. ही झाडे डेरेदार असतात. काही वनस्पती पाण्याखाली आढळतात. म्हणजे, शेवाळ. तर काही कमळासारख्या वनस्पती पाण्यावर तरंगतात. • एवढंच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्येही विविधता आढळते. आंब्याचे किती वेगवेगळे प्रकार असतात.- पायरी, हापूस, तोतापुरी, रायवळ, केसरी, दशेरी. गुलाबाचे वेगवेगळे प्रकार असतात .- लाल गुलाब, पंधरा गुलाब, पिवळा गुलाब केशरी गुलाब. गुलाबाच्या वेलाला गुच्छांनी फुले येतात. • तांदळाचे वेगवेगळे प्रकार असतात.:- बासमती तांदूळ, आंबेमोहर तांदूळ, लाल तांदूळ कोलम, इंद्रायणी आणि इतरही अनेक. • आपल्याला असे वाटते वनस्पती म्हणजे त्यात खोड, मूळ, पाने, फुले, फळे, या सर्व गोष्टी येतात. पण सर्व वनस्पतींमध्ये असे दिसून येत नाही. • जगातील सर्वात लहान फूल असणाऱ्या वनस्पतीचे नाव वुल्फिया आहे. या फुलाचा व्यास ०.५ मिलीमीटर एवढा कमी असतो. • जगातील सर्वात मोठे फुल इंडोनेशिया मध्ये आढळते. • ह्या फुलाचे नाव राफ्लेशिया अरनोल्डी असून ह्या फुलाचा व्यास सुमारे १ मीटर असतो.