नैसर्गिक साधनसंपत्ती

खनिजे कशी तयार होतात?

views

3:57
आता आपण निसर्गात कोण-कोणती खनिजे आहेत आणि ती कशी तयार होतात त्याची माहिती पाहणार आहोत. मॅग्नेटाईट व अभ्रक: भूकवचातील मॅग्मा व ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा लाव्हारस थंड होतो. त्याचे स्फटिकात रूपांतर झाल्याने मॅग्नाईट व अभ्रक अशी खनिजे तयार होतात. हलाईट व जिप्सम: बाष्पीभवन झाल्यामुळे द्रव उडून जातो. स्थायूरूप स्फटिक शिल्लक राहते. त्यामुळे हलाईट व जिप्सम सारखी खनिजे निर्माण होतात हिरा व ग्रॅफाईट :खनिजे ही एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात बदलली जातात. कारण त्यांच्यावर तापमान व दाब यांचा मोठया प्रमाणात परिणाम होतो. असेंद्रिय खनिजे: असेंद्रिय खनिजांची निर्मिती करणारे काही सजीव असतात. उदा. कॅल्शिअमचे कवच तयार करणारे शंख – शिंपले. माशांची हाडे इत्यादी. अधातू खनिजे: अधातू खानिजांमध्ये हिरा, फेल्डस्पार, ग्रॅफाईट, अभ्रक, गंधक, जिप्सम, पोटॅश या खनिजांचा समावेश होतो. धातू खनिजे: लोह, सोने, कथील, चांदी, बॉक्साईट, मँगनीज, प्लॅटिनम, टंगस्टन या खनिजांचा धातू खानिजांमध्ये समावेश होतो. ऊर्जारूपी खनिजे: दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू इत्यादी खनिजांचा ऊर्जारूपी खनिजांमध्ये समावेश होतो. अशा प्रकारे गुणधर्मांनुसार खनिजांचे वर्गीकरण आपण पाहिले आहे.