नैसर्गिक साधनसंपत्ती

इंधन

views

4:45
ऊर्जानिर्मीतीसाठी दैनंदिन जीवनात जे पदार्थ वापरले जातात त्याला ‘इंधन’ असे म्हणतात.हीच इंधने स्थायू, द्रव व वायू या स्वरुपामध्ये आढळतात.जीवाश्म इंधानापैकी दगडी कोळसा या स्थायुरूप इंधानाविषयी जाणून घेऊया.दगडी कोळसा: निसर्गामध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींमुळे कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील जंगले जमिनीत गाडली गेली आणि या जैविक द्रव्यावर मातीचे थर जमा झाले. त्यामुळे वरच्या बाजूने पडणारा दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा या द्रव्यावर परिणाम होऊन या वनस्पतीचे हळूहळू जीवाश्म इंधनात रूपांतर झाले. या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला आहे.दगडी कोळसा हा खाणीमध्ये सापडतो. बऱ्याच ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आहेत. पीट, लिग्नाईट (ब्राउन कोल), बीटयुमिनस कोल, अँथ्रासाईट हे दगडी कोळशाचे प्रकार आहेत. यापैकी अँथ्रासाईट हा उच्च प्रतीच्या कोळशाचा प्रकार आहे. दगडी कोळसा हा कार्बनचाच एक प्रकार आहे. दगडी कोळशापासून औष्णिक वीज तयार केली जाते. त्यासाठी हा कोळसा जाळला जातो. म्हणजेच औष्णिक वीजनिर्मीती केंद्रामध्ये दगडी कोळसा इंधन म्हणून कार्य करतो. तसेच त्याचा उपयोग बॉयलर्स व रेल्वे इंजिन चालवण्यासाठीही केला जातो. दगडी कोळशाचा उपयोग स्वयंपाकासाठी आणि विटा भाजण्यासाठी वीटभट्ट्य़ांमध्येही मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच प्रोड्युसर गॅस व वॉटर गॅस निर्मितीसाठी दगडी कोळसा वापरला जातो.