नैसर्गिक साधनसंपत्ती

लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस

views

2:11
अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होते. गॅसवर उच्च दाब देऊन त्याचे आकारमान 1/240 (१ छेद २४०) पट करताना त्याचे द्रवात रूपांतर होते. पेट्रोलियम गॅस हा दाबाखाली द्रवरूप अवस्थेत राहावा यासाठी तो पोलादी जाड टाक्यांमध्ये (Tank) साठवला जातो. गॅसच्या टाकीतून बाहेर येताना परत त्याचे वायूत रुपांतर होते. यामध्ये प्रामुख्याने प्रोपेन व ब्युटेन हे दोन घटक 30 : 70 या प्रमाणात असतात. हे वायू गंधहीन असतात. म्हणजेच याला वास नसतो. परंतु त्याची गळती झाली तरी अपघात होऊ नये म्हणून त्यामध्ये ‘इथिल मरकॅप्टन’ नावाचे तीव्र वास असणारे एक रसायन अल्प प्रमाणात मिसळलेले असते. म्हणून LPG ची गळती झाली की ते लगेच आपल्या लक्षात येते. नैसर्गिक वायू हे पर्यावरणस्नेही इंधन आहे. कारण या इंधनामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. आपण घरात स्वयंपाकासाठी जो गॅस वापरतो त्यालाच LPG म्हणतात. लोकसंख्या सतत वाढते आहे. परंतु जीवाश्म इंधनाचे साठे हे मर्यादितच आहेत. त्यात वाढ होत नाही. पण वाढत्या लोकसंख्येमुळे ते साठे संपण्याची भीती निर्माण झाली आहे. खनिज तेल, दगडी कोळसा या जीवाश्म इंधनाचे साठे खूप कमी आहेत व या इंधनाची मागणी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे या इंधनाला पर्यायी इंधन म्हणून हायड्रोजन, जैव इंधने, मिथेनाल, किंवा वूड अल्कोहोल, इथेनॉल किंवा ग्रीन अल्कोहोल ही इंधने वापरात आणली जात आहेत. इंधने ही आपली साधनसंपत्ती आहे.