नैसर्गिक साधनसंपत्ती

वनसंपत्ती

views

5:00
वनस्पती ही खूप महत्त्वाची साधनसंपत्ती म्हणून ओळखली जाते. वन म्हणजे जंगल. आपल्या आसपास अशा मोकळ्या जागेवर आपण बऱ्याच प्रकारच्या वनस्पती पाहतो. या वनस्पती पर्यावरणाचा समतोल राखण्यास खूप मदत करतात. वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशास जंगल म्हणतात. विस्तृत प्रदेशात वनस्पतीच्या विविध जाती एकत्रित दिसतात. त्यालाच आपण जंगल असे म्हणतो. जंगलामध्ये विविध वनस्पती, सजीव प्राणी, सूक्ष्मजीव राहत असतात. जगातील एकूण भूभागांपैकी 30 % भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे. जंगलाची विशिष्ट अशी संरक्षक आणि उत्पादक कार्ये आहेत. जंगलाची संरक्षक कार्ये :- 1) जंगलातील वनस्पतींमुळे जमिनीची धूप होत नाही. त्यामुळे मृदेचे संवर्धन होते. त्यामुळे जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो. 2) वनस्पतींमुळे पाणी अडवले जाते. ते पाणी जमिनीत मुरते. 3) पावसामुळे पूर येतात. परंतु जंगलातील वनस्पतींमुळे पुरावर नियंत्रण ठेवता येते. 4) वनस्पती जास्त प्रमाणात व दाट असतील तर त्यांच्या सावलीमुळे पृथ्वी वरील पाण्याचे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. 5) जंगलातील प्राण्यांचे दाट झाडीमुळे संरक्षण होते. 6) वायूंचे हवेमधील संतुलन राखले जाते. वनामुळे आपण आपले पर्यावरण वाचवू शकतो. जंगले पर्यावरण वाचवण्यास मोलाची मदत करतात.