नैसर्गिक साधनसंपत्ती

रबर

views

5:16
आपण रबराचा उपयोगही दैनंदिन जीवनात विविध ठिकाणी करतो. हे रबर आपल्याला वनस्पतीपासूनच मिळते. रबर या वनस्पतीपासून ‘चिक’ निघतो.रबराचा पुरवठा थांबला म्हणजेच रबर जर मुबलक प्रमाणात मिळाले नाही तर काय होईल?रबरी वस्तू, टायर्स मिळणार नाहीत. आणि हे उद्योगधंदे बंद पडतील. रबरापासून अनेक वस्तू बनवल्या जातात. जवळपास 50,000 पेक्षा जास्त वस्तू ह्या रबरापासून बनवल्या जातात. जंगले नसतील तर हवेतील कार्बन डायऑक्साईडचे शोषण कमी प्रमाणात होऊन उष्णता वाढेल. तसेच मानवाला ऑक्सिजन मिळणार नाही. मातीची धूप होईल, पाऊस कमी प्रमाणात पडेल. पूरपरिस्थिती आली तर त्यावर नियंत्रण ठेवता येणार नाही. वन्यप्राणी, मानव यांना अतोनात हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतील. शिवाय मानवाला जंगलापासून अनेक फायदे होतात. ते फायदे मिळणार नाहीत. एकंदरीत सर्व प्रकारच्या सोयीसुविधांना मुकावे लागेल. जंगलाचे संवर्धन: जंगलाचे संवर्धन म्हणजेच जंगलाची वाढ करणे ही आपली जबाबदारीच नाही तर कर्तव्यसुद्धा आहे. विनाकारण झाडे तोडू नयेत. ज्या झाडांचे वय कमी असेल त्यांना जपावे व त्यांची वाढ पुरी होऊ दयावी. झाडांची लागवड करावी. झाडाची काळजी घ्यावी. जंगल वापराच्या बाबतीमध्ये कडक नियम व कायदे करायला पाहिजेत. तसेच वनीकरणासारख्या वृक्षलागवडीच्या मोहिमा हाती घ्यायला पाहिजे. प्रदूषण टाळायला पाहिजे. कारण त्यामुळे वृक्षांवर वाईट परिणाम होतात. लाकडाला पर्याय म्हणून सौर ऊर्जा, पवन उर्जा, अशा नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करायला पाहिजे.