नैसर्गिक साधनसंपत्ती

काही प्रमुख खनिजे व धातुके

views

3:57
आजच्या युगात आपल्या दैनंदिन जीवनात अनेक खनिजे व धातुके यांची गरज पडते. तर या खनिजांना औद्योगिक दृष्ट्याही खूप महत्त्व आहे. लोहखनिज: लोखंडाचे अशुद्ध रूप म्हणजेच लोहखनिज होय. आपल्या रोजच्या जीवनामध्ये लोखंडाच्या अनेक वस्तूंशी आपला संबंध येत असतो.विविध उद्योगांमध्ये लोखंड वापरले जाते. आज तर लोखंड हे मानवी जीवनातील प्रमुख खनिज आहे असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. कारण सुरुवातीला मानव शेती करताना लाकडी अवजारे वापरत होता. पण आज याची जागा लोखंडाने घेतली आहे. आज बऱ्याच ठिकाणी लोखंड वापरले जाते. उदा. रेल्वे उद्योग, शेती उद्योग इ. तर या लोहखनिजाचे मॅग्नेटाईट, हेमॅटाईट, लिमोनाईट, सिडेराईट हे चार प्रमुख प्रकार आहेत.मँगनीज: मँगनीज हे खूप महत्त्वपूर्ण खनिज आहे. कारण औषध तयार करण्यासाठी, काचेला गुलाबी रंग देण्यासाठी व विद्युत उपकरणामध्ये मँगनीज खनिजाचा उपयोग केला जातो. हे खनिज कार्बोनेट, सिलिकेट, ऑक्साइड या स्वरुपात आढळून येते.बॉक्साईट: बॉक्साईट हे खनिज अॅल्युमिनिअम ऑक्साईडपासून बनलेले असते. अॅल्युमिनिअमचे प्रमुख धातुक म्हणून बॉक्साईटला ओळखले जाते. तांबे : तांबे हे लोह, व इतर खनिजाच्या सान्निध्यात अशुद्ध स्वरुपात आढळते. तांबे हे शीघ्र विद्युत वाहक आहे. त्यामुळे तांबे विजेच्या तारा, टेलीफोन, वाहने, भांडी, मूर्ती निर्मितीमध्ये वापरले जाते.अभ्रक: अभ्रक हे विद्युतरोधक आहे. त्यांच्या थराच्या जाडीवर अभ्रकाचे मूल्य ठरले जाते. तुमच्या घरामध्ये कपडे इस्त्री करणाऱ्या इस्त्रीमध्ये, औषधामध्ये, रंगामध्ये, विद्युतयंत्रे व उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणेमध्ये म्हणजेच, मोबाईल, संगणकामध्ये अभ्रक या खनिजाचे कार्य मोलाचे ठरतेइतिहासपूर्व काळात धातूखनिजांचा वापर केल्यामुळे विविध युगांना विविध नावे प्राप्त झाली. इ.स.पूर्व 6000 ते इ.स पूर्व 5000 च्या दरम्यान माणसाने तांबे या धातूचा वापर केल्याने तेव्हा ताम्रयुगाची सुरुवात झाली असे मानले जाते. नंतर तांबे आणि कथिलापासून तयार होणाऱ्या मिश्रधातूचा म्हणजे कांस्य (ब्राँझ) धातूचा वापर सुरु झाला. 3600 ते 1600 वर्षे ख्रिस्तपूर्व काळाला ‘ब्राँझयुग’ म्हणून ओळखले जाते. या काळामध्ये मानव ब्राँझचा वापर करीत असे. त्यानंतरचा कालखंड हा ‘लोह्युग’ म्हणून ओळखला जातो. 1000 वर्ष ख्रिस्तपूर्व ते इ.स. 600 या वर्षात लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता. त्यामुळे या काळास ‘लोहयुग’ म्हटले जायचे.