नैसर्गिक साधनसंपत्ती

नैसर्गिक वायू

views

4:04
नैसर्गिक वायू हे भूगर्भात सजीवांच्या अवशेषांपासून उच्च दाबाखाली तयार होतात. ते भूगर्भात पेट्रोलियमच्या सान्निध्यात किंवा काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणूनच सापडतात. नैसर्गिक वायूमध्ये मिथेन (CH4) हा महत्त्वाचा घटक असतो. इथेन (C2H6) व प्रोपेन (C3H8) व ब्युटेन ((C4H10) हे घटक कमी प्रमाणात असतात. हाच नैसर्गिक वायू वायुवाहिन्यांद्वारे वाहून नेला जातो. मात्र काही ठिकाणी हे नैसर्गिक वायू वाहून नेण्यासाठी पुरेशा प्रमाणात वायुवाहिन्या उपलब्ध नसतात. त्यामुळे त्याचे उच्च दाबाखाली कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस CNG व लिक्विड नॅचरल गॅस LNG यामध्ये रुपांतर केले जाते. त्यामुळे हे गॅस वाहून नेणे सोपे जाते. आज बऱ्याच ठिकाणी CNGवायूवर चालणारी वाहने वापरली जातात. त्यामुळे हवेचे प्रदूषण कमी होते. शिवाय CNG गॅसचा वापर आज सर्वत्रच होत आहे. ONCG विषयी थोडी माहिती तेल आणि वायू संशोधन तसेच त्यांचे उत्पादन करण्यासाठी 14 ऑगस्ट 1956 रोजी तेल व नैसर्गिक वायू महामंडळांची स्थापना करण्यात आली. यालाच ONGC असे म्हटले जाते (Oil and natural Gas Corporation). भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत ही संस्था कार्य करते. ONGC ही भारतातील सर्वात मोठी तेल व वायू संशोधन उत्पादन कंपनी आहे. तिचे मुख्यालय उत्तराखंडमध्ये डेहरादून येथे आहे. ONGC या कंपनीद्वारे भारतातील जवळपास 77% कच्च्या तेलाचे व 62% नैसर्गिक वायूचे उत्पादन केले जाते. ONGC या कंपनीने भारतामधील भूगर्भातील 7 तेल साठ्यांपैकी 6 तेलसाठ्यांचा शोध घेतला आहे. मुंबईतील ‘सागरसम्राट’ या तेलविहिरीचे काम ONGC पाहते.