नैसर्गिक साधनसंपत्ती

सागरी खनिज व जैविक संपत्ती

views

3:55
भूगर्भाप्रमाणेच अनेक प्रकारची खनिजे समुद्रात, समुद्राखाली सापडतात. समुद्राखाली आपल्याला मँगनीज, गंधक, युरेनिअम, तांबे, जस्त, शिसे, लोखंड, कथील, क्रोमियम, फॉस्फेट इत्यादींचे साठे मोठ्या प्रमाणात सापडतात. सागरतळाशी आपल्याला खनिज तेल व नैसर्गिक वायूचा साठा मोठया प्रमाणात आढळून येतो. तसेच विहिरी खोदून ‘प्रभागी उर्ध्वपातनाने’ आपण विविध तेल व वायू सागरातून मिळवू शकतो. सागरी जीवांपासून विविध प्रकारचे औषधी तेल मिळते. तसेच मीठसुद्धा समुद्रातूनच मिळते. भारतामध्येसुद्धा खनिज तेल मिळवण्यासाठी विविध यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत.भारतात सागरतळातून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 साली ‘मुंबई हाय’ या ठिकाणी ‘सागर सम्राट’ या नावाची पहिली खनिज तेल विहीर खणली गेली. ONGC म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाद्वारे ही विहीर खणली आहे. या विहिरीतून मिळणारा नैसर्गिक वायू पाईपलाईनद्वारे उरण या ठिकाणी वाहून आणला जातो. सागरी खनिज संपत्ती: सागरामध्ये आपल्याला थेरिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सोडिअम, सल्फेट अशी विविध खनिजे सापडतात. सागरी जैविक साधन संपत्ती : कोळंबी, सुरमई, पापलेट इत्यादी मासे: हे प्रथिने व जीवनसत्वे यांचे स्त्रोत असल्याने अन्न म्हणून वापरले जातात. सुकट, बोंबील यांची भुकटी: याचा कोंबडीचे खाद्य व शेतातील खतासाठी उपयोग होतो. शिंपले: शिंपल्यांपासून विविध औषधे तयार केली जातात. तसेच अलंकार, शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी शिंपल्यांचा उपयोग केला जातो. बुरशी: बुरशीपासून विविध प्रतिजैविकांची निर्मिती केली जाते. शार्क, कॉड मासे: या सागरी माशांपासून अ, ड, इ. जीवनसत्त्वयुक्त तेलाची निर्मिती केली जाते. समुद्रकाकडी: कॅन्सर, ट्युमर यासारख्या आजारावर ‘समुद्र काकडी’ औषधी म्हणून वापरली जाते.सागरी व्यवसाय: मुलांनो, आपल्याला माहीत आहे की, समुद्राचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ,मासेमारी: समुद्रामध्ये ‘मासेमारी’ हा प्रमुख व्यवसाय आहे. विविध प्रकारच्या माशांच्या जाती, प्रजाती समुद्रात आढळून येतात.मिठागरे: समुद्रापासून मीठ मिळते. समुद्राच्या काठी मोठ मोठी ‘मिठागरे’ असतात. मिठाची शेती हा मोठा उद्योग आहे.वाहतूक: समुद्रातून मालाची वाहतूक केली जाते. बऱ्याच ठिकाणी मोठ – मोठी बंदरे उभारण्यात आली आहेत.