विश्वाचे अंतरंग

तारे व ताऱ्याचे प्रकार

views

1:46
आपण रात्रीच्या वेळी आकाशातले तारे पाहत असतो. . तारे हे स्वयंप्रकाशित असतात. तारे आकाशात लुकलुकतात. लुकलुकणारे हजारो तारे हे आकाशगंगेचे घटक आहेत. आकाशगंगेतील ताऱ्यांपैकी काही तारे हे तेजस्वी आहेत तर काही तारे अंधुक असतात. निळे, पांढरे, पिवळे, तांबूस असे विविध रंग असलेले तारेसुद्धा आकाशगंगेमध्ये आहेत. मृग तारकासमूहातील काक्षी हा तारा लाल रंगाचा दिसतो. स्वाती नक्षत्राचा तारा नारंगी रंगाचा आहे. व्याध हा निळसर रंगाचा तारा आहे. स्वतःचे तेज बदलणारे तारे सुद्धा आकाशात आहेत. सूर्य हा पृथ्वीला सर्वांत जवळचा तारा आहे. "ध्रुवतारा" पृथ्वीच्या गोलाकार फिरण्याच्या अक्षावर असल्याने तो एकाच ठिकाणी स्थिर दिसतो. आणि हा तारा पृथ्वीच्या 'उत्तर दिशेला' आहे. धूलीकण आणि वायू यांच्या एकत्र येण्याने प्रचंड तेजोमेघ तयार होतो. हा तेजोमेघच ताऱ्यांना जन्म देतो ताऱ्यांचे पृष्ठभागाचे तापमान ३५०००C ते ५००००C मर्यादेत असते.