विश्वाचे अंतरंग

मंगळ

views

3:32
मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. मंगळावरच्या मातीमध्ये लोह असल्यामुळे मातीचा रंग लालसर दिसतो. म्हणून या ग्रहाला ‘लाल ग्रह’ असेही म्हटले जाते. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ‘ऑंलिम्पस मॉन्स’ तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस आहे. हा एक खडकाळ ग्रह असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर २३ कोटी किमी इतके आहे. त्याला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 24 तास ३७ मिनिटे लागतात. तर सूर्याभोवतीची प्रदक्षिणा तो १ वर्ष ८८ दिवसात पूर्ण करतो. मंगळाला फोबॉस आणि डीमॉस नावांचे दोन छोटे नैसर्गिक उपग्रह आहेत.