विश्वाचे अंतरंग

सूर्यमाला

views

3:33
सूर्यमालेत सूर्य, त्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांचे उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धुमकेतू आणि उल्का इत्यादी खगोलीय वस्तू आहेत. सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या या सर्व खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत. त्यांपैकी बुध, शुक्र, पृथ्वी, आणि मंगल हे अंतर्ग्रह आहेत. तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सर्व बहिर्ग्रह आहेत. सर्व अंतर्ग्रहाचे कवच कठीण असते. तर बहिर्ग्रहाचे बाह्यावरण हे वायुरूप असते. सूर्यमालेतील या सर्व ग्रहांपैकी केवळ बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह सहजासहजी पाहता येतात. सूर्यमालेतील प्रमुख वस्तू म्हणजे सूर्य होय. म्हणूनच सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते. आणि इतर ग्रहरी सूर्याभोवती फिरतात. या सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून.