विश्वाचे अंतरंग

सूर्यमालेतील ग्रहांची माहिती भाग 1

views

3:47
आता आपण सूर्यमालेतील इतर ग्रहांची माहिती घेऊ.१) बुध : सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर फक्त ५७, ९०९१७५ किलोमीटर आहे. २) शुक्र : सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर, आणि पृथ्वीअगोदर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे. शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. ३) पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासून तिसरा तर आकाराने पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात. ४) मंगळ:- मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. मंगळावरच्या मातीमध्ये लोह असल्यामुळे मातीचा रंग लालसर दिसतो. ५) गुरु : गुरू सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे. ६) शनी : सूर्यमालेतील ग्रहांमध्ये शनी हा सूर्यापासून सहाव्या स्थानावर आहे. गुरु ग्रहानंतरचा हा सर्वात मोठा ग्रह आहे.