विश्वाचे अंतरंग

युरेनस

views

5:24
युरेनस सूर्यापासून सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. हा ग्रह दुर्बिण असेल तरच पाहता येतो. युरेनस ग्रहाचा आस खूप कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्षे लागतात. आणि स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास १७ तास २४ मिनिटे लागतात . सर विल्यम हर्षल यांनी हा ग्रह १३ मार्च १७८१ साली शोधल्याची घोषणा केली. युरेनसच्या वातावरणात ८३% हायड्रोजन, १५% हेलीयम, २% मिथेन व असिटिलीन चे काही अंश आहेत. युरेनसला २७ नैसर्गिक उपग्रह आहेत.