विश्वाचे अंतरंग

उपग्रहांची माहिती

views

5:8
उपग्रह: सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता इतर ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना ‘उपग्रह’ म्हणतात. ग्रहांप्रमाणे उपग्रह स्वतःभोवती सुद्धा फिरतात. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. पण चंद्रावर वातावरण नाही. बुध आणि शुक्र हे ग्रह सोडले तर बाकी सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. चंद्राचा भ्रमणकाळ आणि परिवलन काळ २७.३ दिवस इतका आहे. उपग्रह दोन प्रकारचे असतात. –1) नैसर्गिक उपग्रह : उदाहरण - चंद्र, टायटन (शनीचा उपग्रह)व 2) कृत्रिम (किंवा मानवनिर्मित) उपग्रह.उदाहरण – स्पुटनिक, इन्सॅट. भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम १९७० मध्ये इस्रोने सुरू केले. ह्या कामाचे प्रोजेक्ट लीडर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते.