विश्वाचे अंतरंग

उल्का

views

3:40
उल्का:- आपल्याला कधी-कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो. या घटनेलाच ‘उल्कापात’ असे म्हणतात. उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड होय. मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणामुळे पूर्णपणे जळतात, त्यांनाच ‘उल्का’ म्हणतात. काही वेळेस उल्का पूर्णपणे न जळता पृथ्वीवर पडतात. त्यांना ‘अशनी’ असे म्हणतात. पृथ्वीवर मोठ्या आकारात पडणाऱ्या उल्केला उल्कापात म्हणतात. महाराष्ट्रात असणारे ‘लोणार सरोवर’ अशाच अशनी आघाताने तयार झाले आहे. पृथ्वीवरच नाही तर इतर खगोलीय वस्तूंवर देखील उल्कापात आणि अशनीपात होतात.