विश्वाचे अंतरंग

ताऱ्यांचे प्रकार

views

3:49
1) सूर्यसदृश तारे:- सूर्यसदृश ताऱ्यांचा आकार सूर्यापेक्षा थोडा कमी किंवा जास्त असू शकतो. याच्या तापमानात मात्र खूप फरक असतो. हे तारे तांबूस किंवा निळा रंग असलेले असतात. उदा. मित्र, व्याध हे तारे. २) तांबडे राक्षसी तारे - तांबड्या राक्षसी ताऱ्यांचे तापमान ३०००० c ते ४००००c पर्यंत असते. या ताऱ्यांचे तेज सूर्याच्या तेजापेक्षा १०० पटीने जास्त असू शकते. ३) महाराक्षसी तारे - हे तारे तांबड्या राक्षसी ताऱ्यांपेक्षा मोठे व तेजस्वी असतात. या ताऱ्यांचे तापमान ३०००० c ते ४००००c या मर्यादेतच असते. परंतु या ताऱ्यांचा व्यास मात्र सूर्यापेक्षाही शेकडो पट जास्त असतो. ४) जोड तारे - आकाशातील निम्म्या ताऱ्यांपेक्षा जास्त तारे हे जोड तारे आहेत. म्हणजेच दोन तारे परस्परांभोवती भ्रमण करतात. काही वेळेस तीन किंवा चार तारे सुद्धा परस्परांभोवती भ्रमण करतात.