कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये

सांगा पाहू

views

4:58
सांगा पाहू : मुलांनो, तुम्ही एका ठिकाणी स्थिर बसून पुस्तक वाचत असतानाही तुमच्या शरीरात काही क्रिया सुरु असतात. त्या क्रियांची जाणीव तुम्हाला होत असल्यास त्या सांगा. श्वसन :- मुलांनो, मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र व निवारा या आहेत. परंतु याहीपेक्षा जास्त महत्त्वाच्या गरजा म्हणजे हवा व पाणी या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची गरज हवेची आहे. हवेशिवाय आपण काही सेकंदेसुद्धा राहू शकत नाही. मुलांनो हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड यांसारखे वायू असतात. या सर्वच वायूंची आपल्या शरीराला गरज नसते. यातील फक्त ऑक्सिजन आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. श्वासपटल व त्याची हालचाल : श्वासपटलाच्या हालचालीवरून समजते, की हवा आत घेतली जात आहे की बाहेर फेकली जात आहे. जेव्हा श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा हवा नाकावाटे आत येऊन श्वसनलिका व तिच्या शाखांमधून पुढे वायुकोशात भरली जाते. वायूंची देवाणघेवाण :- हवेच्या पिशव्यांत म्हणजे वायुकोशात बाहेरील हवा पोहोचली, की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या सभोवती असलेल्या बारीकसारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून संपूर्ण शरीराच्या सर्व भागांत वाहून नेला जातो.