कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये

नवा शब्द शिका:

views

4:16
१. पाचकरस – पचनक्रियेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत करणारा द्रवपदार्थ म्हणजे पाचकरस होय. २. ग्रंथी –विशिष्ट प्रकारचा द्रव ज्या इंद्रियांतून वाहतो, त्याला ग्रंथी असे म्हणतात. पचन :- मुलांनो, आपण जे अन्न तोंडाद्वारे घेतो, ते अन्ननलिकेद्वारे शरीरात पोहचते व ते शरीरातील विविध पचनेद्रियांद्वारे पचत जाते आता अन्ननलिका, पचनेंद्रिये व त्यांच्या कार्याविषयी आपण थोडक्यात महिती घेऊ. अन्ननलिका :- मुलांनो हया आकृतीत तोंडापासून ते गुदद्वारापर्यंत एक नलिका दिसत आहे. तिला अन्ननलिका असे म्हणतात. आपण जे अन्न खातो त्या अन्नाचे शरीरातील पचनेंद्रियांमार्फत पचन होते. म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. हे पचनक्रियेचे काम आपल्या शरीरातील एका अतिशय लवचीक व लांबच लांब नळीच्या विविध भागांमध्ये पार पडते. या नळीला अन्ननलिका असे म्हणतात. पचनेंद्रिये :- मुलांनो, आपण तोंडात अन्नाचा घास घेतल्याबरोबरच पचनक्रियेच्या कार्यास सुरूवात होते. आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो. जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते. दातांनी आपण अन्न चावतो. चावता चावता त्यात तोंडातील लाळ मिसळते. त्यामुळे अन्नाचा ओलसर गोळा तयार होतो. तो अन्नाचा गोळा सहजपणे गिळता येतो. हा गिळलेला घास ग्रासनलिकेत जातो. ग्रासनलिकेची भिंत लवचीक असते. त्यामुळे अन्नाचा घास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेला जातो.