कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये

माहीत आहे का तुम्हांला?(2)

views

3:52
माहीत आहे का तुम्हांला ? मुलांनो, जशी आपल्याला अन्नाची गरज असते, तशीच पाण्याचीही गरज असते. अन्नपचनाचे काम होण्यासाठी तसेच अन्नमार्गातून किंवा अन्ननलिकेतून अन्न पुढे पुढे सरकत राहण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते. आपल्या शरीरात अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी दिवसातून साधारणपणे दोन ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे असते. नाही तर आपल्याला अपचनाचा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. बद्धकोष्ठता म्हणजे शौचाला होताना खडा पडणे, तसेच शौचाला होताना त्रास होणे, नियमितपणे शौच न होणे यासारखे त्रास कमी पाणी प्यायल्याने होऊ लागतात. मुलांनो आपले दात चांगले राहायला हवे असल्यास त्यांची लहानपणापासूनच नीट काळजी घेणे गरजेचे असते. तोंडातील प्रत्येक दाताला एनॅमल नावाच्या पदार्थाचे आवरण असते. एनॅमल हा आपल्या शरीरातील सर्वात टणक असा पदार्थ आहे. त्याच्या आवरणामुळे दातांच्या आतील नाजूक भागांचे रक्षण होते. हा पदार्थ टिकून राहण्यासाठी दात नियमितपणे स्वच्छ करणे गरजेचे असते. आपण रोजच्या रोज दात स्वच्छ न केल्यास हे एनॅमलचे आवरण नष्ट होते.