कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये

माहीत आहे का तुम्हांला?

views

2:13
मुलांनो, आपण जी हवा शरीरात घेतो ती हवा स्वच्छ व पूर्णपणे शरीराला फायदेशीर असेलच असे नाही. तर त्यात धूळ व धुराचे कण असू शकतात. तसेच त्या हवेत रोगाला कारणीभूत ठरणारे किंवा शरीराला अपाय करू शकतील असे रोगजंतूही असू शकतात. श्वसनेंद्रियांच्या आतल्या बाजूला चिकट बुळबुळीत श्लेष्म असते. श्लेष्म म्हणजे कफ. हवेतील कण यावर चिकटून बसतात. त्यामुळे हवेतील हानिकारक शरीराला अपाय करतील असे कण फुफ्फुसांपर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे या कणांपासून शरीराचे होणारे नुकसान टाळले जाते व शरीर धूळ, धूर व रोगजंतूंपासून मुक्त राहते.