कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये

सांगा पाहू! (2)

views

4:56
सांगा पाहू ! शि: मुलांनो, सांगा पाहू, श्वासोच्छवास घडवून आणण्यामध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा सहभाग असतो? इंद्रियसंस्था :- नाक, श्वसननलिका, फुफ्फुसे, श्वासपटल यांसारख्या अनेक इंद्रियांनी मिळून श्वासोच्छवास घडवून आणला जातो हे तुम्हांला माहीत आहे. यांपैकी कुठलेही एक इंद्रिय नीट काम करत नसेल, तर श्वासोच्छवासाचे काम पूर्ण होणार नाही. शरीराचे एखादे काम एकत्रितरीत्या पूर्ण करणा-या इंद्रियांच्या अशा गटाला इंद्रियसंस्था म्हणतात. म्हणून नाक, श्वासनलिका फुफ्फुसे आणि श्वासपटल यांना एकत्रितपणे श्वसनसंस्था म्हणतात. शरीरातील ऊर्जा :- श्वसनक्रियेतून ऑक्सिजन वायू शरीरातील रक्तात मिसळतो आणि रक्ताबरोबर तो शरीराच्या सर्व भागात पसरतो. पचनक्रियेतून तयार झालेले काही पदार्थही रक्तात मिसळतात व रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागांत पोहचतात. त्यांपैकी काही पदार्थ शरीरासाठी इंधनाचे म्हणजेच ऊर्जेचे काम करतात. रक्ताभिसरण :- अन्नातील इंधनपदार्थ म्हणजे शरीराला ज्या पदार्थांपासून ऊर्जा प्राप्त होते ते पदार्थ व हवेतील ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागांत पोहचविण्याचे काम रक्तवाहिन्यांतून सतत वाहत असणारे रक्त करते. पण हे रक्त सतत रक्तवाहिन्यातून वाहते ठेवण्याचे काम शरीरातील कोणता अवयव करतो? हे काम होण्यासाठी ह्दय कार्य करते. उदा. अन्न, पाणी यांसारखे पदार्थ रक्ताभिसरणामुळेच शरीराच्या सर्व भागात पोहचविणे शक्य होते. “ह्दय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळून ‘रक्ताभिसरण संस्था’ असे म्हणतात”. मुलानो, आतापर्यंतच्या माहितीतून आपल्याला समजले की, श्वसनसंस्था, पचनसंस्था व रक्ताभिसरणसंस्था या इंद्रिय संस्थांचा शरीराला ऊर्जा मिळून देण्याच्या कामात सहभाग असतो.