कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये

धूम्रपानाचे परिणाम

views

2:54
धूम्रपानाचे परिणाम :- मुलांनो, धूम्रपान करणे म्हणजे विडी किंवा सिगारेट ओढणे होय. आपल्या आसपासचे काही लोक मोठया प्रमाणात धूम्रपान करीत असतात. सतत धूम्रपान केल्यामुळे नाकावाटे व तोंडावाटे जाणारे धुरातील काही विषारी पदार्थ फुफ्फुसात साठू लागतात. हे विषारी पदार्थ फुफ्फुसांतील जागा व्यापतात. म्हणूनच धूम्रपान करणाऱ्या लोकांना श्वसनेद्रियासंबंधीचे दमा, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे यांसारखे आजार होतात. तसेच फुफ्फुसांचा कर्करोग असे बरे न होणारे आजारही होऊ शकतात. म्हणून मुलांनो, धूम्रपान करू नये. आपणही आपल्या घरातील व शेजारी राहाणाऱ्या लोकांना धूम्रपानाचे दुष्परिणाम सांगावेत व त्यांना धूम्रपान करण्यापासून दूर ठेवावे. अप्रत्यक्ष धूम्रपान :- एखादया व्यक्तीने धूम्रपान केल्यास त्याला आजार होऊ शकतात. पण मुलांनो, प्रत्यक्ष धूम्रपान न करताही आपल्याला असे आजार होऊ शकतात. त्याला अप्रत्यक्ष धूम्रपान असे म्हणतात. मुलांनो सार्वजनिक ठिकाणी म्हणजे शाळा, बाग, बसस्थानक, रेल्वेस्थानक, दवाखाना यांसारख्या ठिकाणी धूम्रपान करण्यावर कायद्याने बंदी घातली आहे. एखादया घरातील मोठी माणसे घरातच विडी, सिगारेट ओढत असतील, तर तेथेच राहणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.