कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये

माहीत आहे का तुम्हांला?(3)

views

4:43
माहीत आहे का तुम्हांला? – मुलांनो जसे धूम्रपानाचे काही दुष्परिणाम आहेत, तसेच मद्यपानाचेही काही दुष्परिणाम आहेत. मदयपान म्हणजे दारू पिणे होय. मद्यपान करण्यामुळे चेतासंस्थेवर परिणाम होऊन शरीराच्या हालचालींवर मदयपान केलेल्या व्यक्तीचा ताबा राहत नाही. रोज रोज मद्यपान केल्याने पचनेंद्रियांच्या आतील स्तरावर व्रण पडतात. तसेच यकृताच्या व किडनीच्या कार्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मद्यपानामुळे समाजातील आपला दर्जा खालावतो. म्हणून मद्यपान करणे टाळावे. शरीरातील इतर संस्था – मुलांनो या पाठातून आपण शिकलो की आपल्या शरीरात वेगवेगळ्या इंद्रियसंस्था आहेत. श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था व या सर्वांमध्ये समन्वय ठेवणारी चेतासंस्था. या संस्थांशिवाय आपल्या शरीरात दुसऱ्या अनेक संस्था आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा – मुलांनो, आपल्या शरीरातील सर्व इंद्रियसंस्थांचे कार्य व्यवस्थित पार पडणे गरजेचे असते. जर एखादया इंद्रियसंस्थेचे कार्य व्यवस्थित झाले नाही, तर इतर इंद्रियसंस्थांवर त्याचा परिणाम होतो.