कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये

सांगा पाहू! (3)

views

2:48
सांगा पाहू ! – मुलांनो आता पुढच्या तीन प्रश्नांचे एकच उत्तर आहे. ते प्रश्न त्यांचे उत्तर आपण पाहू. १. आपल्याला भूक लागली आहे, आता आपण जेवले पाहिजे, हे आपल्याला कसे कळते? २. तोंडात अन्न आहे आणि त्याचे पचन होण्यासाठी लाळ पाझरायला हवी हे लाळग्रंथींना कसे कळते? ३. श्वसनसंस्था व रक्ताभिसरण संस्थांच्या इंद्रियांची कामे सतत चालू ठेवणे आणि पचनेंद्रियांची कामे सतत चालू ठेवणे आणि पचनेंद्रियांची कामे योग्य त्या वेळीच होणे असे अचूक नियोजन कसे होते? उत्तर : आपल्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते. राग येणे, भूक लागणे, आनंद वाटणे, दु:ख होणे अशा सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो. म्हणून वरील सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे: ते म्हणजे आपला मेंदू. हे कसे होते ते आपण आता समजून घेऊ. चेतासंस्था : मुलांनो, श्वासपटल, ह्दय, पचनसंस्था या सर्वांची कामे शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात. ती इतकी महत्त्वाची असतात, की त्यांची कामे आपल्या कळत नकळत रात्रंदिवस चालू राहणे गरजेचे असते. या व्यतिरिक्त काही कामे आपण आपल्या इच्छेप्रमाणे हवी तेव्हा करतो. उदा. बोलणे, धावणे, खेळणे, अभ्यास करणे इत्यादी. या सर्व प्रकारच्या कामांवर लक्ष ठेवून ती व्यवस्थित, योग्य त्यावेळी, योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करून घेणे याला अवयवांमध्ये समन्वय साधणे असे म्हणतात. हा समन्वय साधण्याचे काम मेंदू करतो. मेंदू आणि शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क असतो. त्यासाठी ते एकमेकांना संदेशवहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात. संदेशवहन म्हणजे एखादया अवयवाला जखम झाली तर त्याचा संदेश संदेशवहन करणाऱ्या अनेक तंतूंनी मेंदूला जाऊन पोहचतो. त्यासाठी ते एकमेकांना संदेशवहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात. त्याला ‘चेतातंतू’ असे म्हणतात. मेंदू आणि चेतातंतूचे जाळे यांना एकत्रितपणे ‘चेतासंस्था’ असे म्हणतात. चेतासंस्था ही शरीरातील सर्व संस्थांमध्ये समन्वय राखण्याचे कार्य करते.