नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन

ओझोनचा थर – संरक्षक कवच

views

1:39
तुम्हाला हे माहीत आहे का की वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन (O3) या वायूचा थर आहे. आपल्या शरीरावरील त्वचा जसे आपल्या शरीराचे संरक्षण करते तसेच ओझोन हा वायू पर्यावरणाचे संरक्षण करतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग होत नाही. पण ओझोनचा थर वातावरणात असणे सजीवांसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ती ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे वातावरणातील उष्णता कमी होण्यास मदत होते. आणि सजीवांचे रक्षण होते. हा ओझोन वायू जर वातावरणातून नष्ट झाला तर उष्णता वाढेल. आणि उष्णता वाढल्यामुळे त्वचेचे रोग होतील. तसेच बाष्पीभवनही वेगात होईल.