नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन

जमीन

views

4:19
डोंगरावरील खडक पावसामुळे अथवा तेथील उतारामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी हलले जातात. नंतर ते खडक फुटतात आणि त्यापासून खडे, गोटे, माती तयार होत असते. त्यामुळेच जमीन आपल्याला दगड, माती, खडक या स्वरूपात आढळून येते. जमीन सर्वत्र सपाट नसते. ती कुठे खोल तर कुठे उथळ असते. तुम्ही जर पठारी भागात गेलात तर तुम्हाला जमीन सपाट दिसेल. पण तुम्ही जर डोंगराळ भागात गेलात तर तुम्हाला उंचवटे असलेली जमीन दिसेल. आंपण पाहिले की सृष्टीतील सजीव पृथ्वीवर हवा, पाणी आणि जमिनीवर राहतात. यात जमिनीवर राहणारे विविध भूचर प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात.