नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन

हवेतील वायूंचे काही उपयोग

views

3:41
आता आपण हवेतील वायूंचे उपयोग काय असतात ते पाहू या. नायट्रोजन - नायट्रोजनचा उपयोग सजीवांना आवश्यक प्रथिने मिळविण्यास होतो. अमोनिआ निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो. ऑक्सिजन - सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. कार्बन डायॉक्साईड - वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायॉक्साईडचा वापर करतात. तसेच आग विझवण्यासाठी अग्निशामक नळकांड्यामध्ये हा वायू वापरला जातो.