नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन

पाणी

views

4:01
‘पाणी हेच जीवन’ ही म्हण आपल्याला माहीतच आहे. पाणी हे निसर्गातून मिळणारे संसाधन आहे. ते म्हणजे सजीवांना मिळालेले वरदानच आहे. आपल्याला पाण्याचा उपयोग विविध कारणांसाठी होत असतो. आता पहा ना, आपल्या दैनंदिन जीवनातच पाण्याचा वापर आपण किती मोठ्या प्रमाणात करत असतो! मानव दररोज साधारण 3 ते 4 लिटर पाणी पीत असतो. ही पाण्याची गरज मानवाप्रमाणेच इतर सजीवांनासुद्धा असते. परंतु ही गरज प्रत्येक सजीवाची वेगवेगळी असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार त्यांची गरज कमी-जास्त असते.