नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन

पृथ्वीवरील उपलब्ध पाणी

views

3:07
आपल्याला हे माहीतच आहे की पृथ्वीवर एकूण २९% जमीन आणि ७१% पाणी आहे. पण आपल्याला हे समजून घेणे गरजेचे आहे की पृथ्वीवर जरी ७१% पाणी असले तरीही हे सर्व पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकत नाही. कारण या सर्व पाण्यापैकी पिण्यासाठी उपलब्ध असणारे पाणी हे अत्यल्प आहे. उर्वरित सर्व पाणी हे समुद्रातील खारट पाणी आहे. त्याचा वापर आपण पिण्यासाठी करू शकत नाही.