नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन

मृदा तयार होण्याची क्रिया

views

3:02
मृदा म्हणजे माती. शेतात आणि इतरत्र धुळीच्या रूपात आपल्याला मृदा आढळते. आपण ज्या जमिनीवर वावरतो ती जमीन देखील मृदेनेच बनलेली असते. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. खडकांची निसर्गात: झीज होऊन त्यांचे मातीत रूपांतर होण्याची क्रिया म्हणजेच अपक्षय होय. मूळ खडकांचा अपक्षय होतो. म्हणजेच त्यांची झीज होते. म्हणजेच खडकापासून मृदा तयार होते.