सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन

views

4:1
जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन याविषयी जाणून घेवू. जंगल प्रदेशात जास्त प्रमाणात वनस्पती आढळतात. या प्रदेशात प्रामुख्याने वृक्ष, झुडूप, रोपटे अशा प्रकारच्या वनस्पती असतात. ही जंगले ही घनदाट असतात. त्यामुळे तेथे सूर्यप्रकाश सहज पोहोचत नाही. म्हणून या जंगलातल्या वनस्पती सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी उंच वाढतात. थोडक्यात ते सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा करतात. या वृक्षांसोबत काही लहान लहान वेली वृक्षांचा आधार घेऊन वाढत असतात. वेली वाढत असताना काही वेलींच्या खोडांवर तणावे निर्माण होतात. हे खोडांवरील तणावे म्हणजेच या वनस्पतींमधील अनुकूलनच होय. तणावे म्हणजे वेलींचा आधार पकडण्यासाठी निर्माण झालेला स्प्रिंगसारखा अवयव.