सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेले अनुकूलन

views

3:34
वनस्पती या स्वयंपोषी व परपोषी अशा दोन प्रकारांच्या असतात. ज्या वनस्पती जमिनीवर स्थिर असून स्वत:चे अन्न स्वत: तयार करू शकतात त्या वनस्पतींना स्वयंपोषी असतात. उदा. आंबा, गुलाब, पेरू इत्यादी. तर ज्या वनस्पतींना अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतींवर अवलंबून राहावे लागते त्या वनस्पती परपोषी असतात. उदा. अमरवेल, बुरशी इत्यादी. अमरवेलीचे शरीर हे केवळ पिवळ्या तंतुमय काड्यांसारख्या खोडांचे जाळे असते. या वनस्पतींना पाने नसतात. आणि पाने नसल्याने त्यांच्यात प्रकाशसंश्लेषणाची क्रिया होत नाही. आणि त्यामुळे या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. म्हणूनच त्यांना इतर वनस्पतींवर अन्नासाठी अवलंबून राहावे लागते. ज्या वनस्पतींच्या आधाराने अमरवेली वाढतात अशा आधारक वनस्पतींच्या खोडांतून पोषकद्रव्ये शोषून घेण्यासाठी तिला चुषक मुळे म्हणजेच शोषणारी मुळे असतात. ही मुळे आधार देण्याऱ्या वनस्पतींच्या रसवाहिन्या व जलवाहिन्यांपर्यंत पोहोचतात. आणि त्या वनस्पतींमधील अन्न, पाणी शोषून घेतात.