सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

डार्विनचा उत्क्रांती सिद्धान्त

views

3:43
चार्ल्स रॉबर्ट डार्विन या शास्त्रज्ञाचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ रोजी झाला. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती आणि विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीतीने उलगडून दाखवता आले. चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून असे सुचवले, की जे सजीव त्या वेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वांत जास्त सक्षम होते, तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वांत जास्त असते. यालाच सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात. डार्विनचा हा पहिला सिद्धान्त आहे.