सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन

views

4:41
वाळवंटी प्रदेश म्हणजे असे प्रदेश की ज्या ठिकाणी सर्वत्र वाळू पसरलेली असून तेथे पाण्याची तीव्र कमतरता असते. म्हणून शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी या प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. उंटासारख्या प्राण्याने जर एकदा पाणी प्यायले तर त्याला खूप दिवस पाणी पिण्याची गरज नसते. म्हणून वाळवंटी प्रदेशात उंटासारखे प्राणी आढळतात. त्याच्या पायांच्या सांध्यांची घडण लवचिक असते. जाड तळवा असलेले लांब, गादीसारखे, पसरट पाय व मागील पायांच्या मांड्यांची वेगळी ठेवण ह्यांमुळे उंटाला लांबलांब टांगा टाकून पळता येते. जेव्हा तो वेगाने पळतो तेव्हा त्याच्या शरीराच्या एका बाजूच्या दोन्ही पायांची हालचाल अशी होते की, तो डोलत चालल्याचा भास होतो. त्याला लांब पापण्या, कानात केस व नाकावर त्वचेची घडी असलेल्या नाकपुड्या असतात. यांमुळे वाळवंटात उष्ण वाळू आणि वारा यांपासून त्याचे संरक्षण होते. उंटाची मान लांब असते. त्यामुळे तो तोंड उंच करून झाडाचा पाला सहज खाऊ शकतो. आणि हाच पाला तो बराच वेळ रवंथ करतो. वाळवंटी प्रदेशात उंटाशिवाय उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणीही आढळतात. आणि ते या वाळवंटात खोलवर बिळे करून राहतात.