सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन

views

4:37
प्राण्यांचे वर्गीकरण शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन गटांत केले जाते. शाकाहारी प्राणी हे वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग करतात. तर मांसाहारी प्राणी हे अन्नासाठी इतर प्राण्यांचा उपयोग करतात. हे अन्न मिळवण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात विशिष्ट असे बदल झालेले असतात. आणि त्या बदलांमुळे त्यांना अन्नग्रहण करणे सोपे जाते. बेडकाची जीभ लांब असल्याने तो आपल्या लांब जिभेने पटकन कीटक पकडतो आणि चटकन गिळतो. साप उंदीर, बेडूक गिळतो. पक्षी त्यांच्या चोचीने किडे, फळे खातात. डासाला दंश करण्यासाठी सुईसारखा अवयव असतो आणि रक्त शोषून घेण्यासाठी नळीसारखा अवयव असतो. फुलपाखरू फुलातील मध पितात. अशा प्रकारे हे सर्व प्राणी त्यांचे भक्ष्य मिळवतात.